
मंगळवेढा: सद्गुरूंच्या बैठकीस जाताना रस्त्यालगत थांबलेल्या सासू- सुनेच्या अंगावर शेतमाल भरलेला कंटेनर उलटल्याने सासू- सुनेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. ३) सकाळी ७.४५ वाजता शहरालगत नेणे मळ्याजवळ घडली. तर नातेवाइकांकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने कंटेनरला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्याची घटना मरवडेजवळ घडली.