Prashant Damle : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून कलावंतांना पाठबळ देणार

प्रेक्षक आणि रंगकर्मी ह्यांच्यामधील दुवा असलेली नाट्यपरिषद ही मराठी नाट्य सृष्टीची शिखर संस्था असून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून कलावंतांना पाठबळ देणार
prashant damle
prashant damlesakal
Summary

प्रेक्षक आणि रंगकर्मी ह्यांच्यामधील दुवा असलेली नाट्यपरिषद ही मराठी नाट्य सृष्टीची शिखर संस्था असून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून कलावंतांना पाठबळ देणार

मंगळवेढा - प्रेक्षक आणि रंगकर्मी ह्यांच्यामधील दुवा असलेली नाट्यपरिषद ही मराठी नाट्य सृष्टीची शिखर संस्था असून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून कलावंतांना पाठबळ देणार असल्याचे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.

सोलापूर जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने नटराज पॅनलच्या प्रचारार्थ येथील इंग्लिश स्कूल येथे उमेदवार तेजस्विनी कदम यांनी बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अकलूज शाखेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड. सुजित कदम, तेजस्विनी कदम, सोमनाथ आवताडे, विश्वनाथ आवड, दिलीप कोरके, अजय दासरी, समद फुलमामडी, विजयकुमार साळुंखे, दिगंबर भगरे, श्रीधर भोसले ,यतीराज वाकळे,प्राचार्य रविंद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, पर्यवेक्षक राजू काझी, दिलीप चंदनशिवे ,सुहास माने आदीजण उपस्थित होते.

अभिनेते प्रशांत दामले म्हणाले, कलाकार म्हणून अनेक प्रेक्षकांना भेटता आले त्याच्या मनातील सर्व गोष्टी जाणून घेता आल्या. निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या माध्यमातून अनेक बदल घडवणार आहोत, पुढील काळात सक्षम होऊन नवीन कलाकार व ग्रामीण भागात संमेलन घेता येतील यासाठी प्रयत्न करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रंगकर्मी खूप आहेत. सगळीकडेची मंडळी मुंबईत येत असतात,त्यांचे प्रश्न वेळीच मार्गी लावणार आहे. प्रेक्षक आणि रंगकर्मी ह्यांच्यामधील दुवा म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद. जिल्ह्यातील 6 उमेदवार अत्यंत हुशार आहेत. ग्रामीण भागाशी निगडित आहेत. ही काम करणारी मंडळी असल्याचे सिने अभिनेते दामले यांनी सांगितले.

उमेदवार तेजस्विनी कदम म्हणाल्या, विद्यार्थी शिक्षक नाटकाची आवड मंगळवेढा मधून सुरवात झाली आहे. कलाकारामध्ये संस्कृती आहे. आमच्या भागात अनेक नाटक प्रेक्षक आहेत.ग्रामीण भागात नाटक रुजले पाहिजे. यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे संमेलन मंगळवेढा येथे द्या अशी मागणी करत नटराज पॅनलच्या माध्यमातून आम्ही सोलापूर जिल्ह्यामधील सांस्कृतिक चळवळ पुढे घेऊन जाणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक आश्पाक काझी केले, सूत्रसंचालन बालाजी शिंदे तर आभार राजेंद्र जाधव यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com