Helicopter Entry : हेलिकॉप्टरमधून लग्नमंडपात अवतरली नववधू! धर्मगावातील रामचंद्र सलगर यांच्याकडून सुनेचे अनोखे स्वागत

मला एक मुलगा व दोन मुली आहेत. मुलाच्या हौसेसाठी नवरी मुलगी हेलिकॉप्टरने आणली. नवरी मुलगी आर्या ही देखील माझी तिसरी मुलगी समजून तिची हौस पूर्ण केली; असं सलगर म्हणाले.
Mangalwedha Bride Helicopter Entry
Mangalwedha Bride Helicopter EntryeSakal

Newlywed Bride Helicopter Entry : लग्न होऊन घरात येणाऱ्या सुनेला तिसरी मुलगी समजून, तिला हेलिकॉप्टरमधून तालुक्यातील धर्मगाव येथील लग्न मंडपात उतरवण्याची इच्छा वरपित्याने पूर्ण करून दाखवली आणि हा विवाह सोहळा या परिसरात चर्चेचा विषय ठरला. हेलिकॉप्टरमधून वधूला आणण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना ठरली.

मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव येथील रामचंद्र सलगर यांचा मुलगा रूपेश याचा बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील संजय देवकते यांची मुलगी आर्या हिच्याबरोबर विवाह काल (गुरुवारी) सायंकाळी पार पडला. धर्मगाव येथील रामचंद्र सलगर यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची होती. असे असतानाही या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी गाव सोडले. पुण्याला जाऊन इलेक्ट्रिक ठेकेदारीच्या व्यवसायात त्यांनी चांगल्या पद्धतीने बस्तान बसवले. त्याचबरोबर या व्यवसायात गावातील अनेकांच्या हाताला काम दिले.

घरातील दोन मुलींचा विवाह झाला. मग मुलाच्या विवाहासाठी मुलीची शोधाशोध केल्यानंतर बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील मुलीशी मुलाचा विवाह जमला. हा घरातील शेवटचा विवाह सोहळा समजून मुलाची व सुनेची हौस पुरविण्यासाठी चक्क सुनेला हेलिकॉप्टरमध्ये लग्न मंडपात आणले. या विवाह सोहळ्यासाठी या परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती. आकाशातून घिरट्या घालत आलेल्या हेलिकॉप्टरमधून नववधूचे आगमन होताच अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या.

मला एक मुलगा व दोन मुली आहेत. मुलाच्या हौसेसाठी नवरी मुलगी हेलिकॉप्टरने आणली. नवरी मुलगी आर्या ही देखील माझी तिसरी मुलगी समजून तिची हौस पूर्ण केली.

- रामचंद्र सलगर, (वरपिता, धर्मगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com