Mangalwedha News : मुख्यमंत्र्यामुळे सत्ता बदल; मग निधी आल्याचे का सांगत नाही

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. राम सातपुते यांना समर्थन देण्यासाठी शिवसेनेची बैठक येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsakal

मंगळवेढा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले म्हणून राज्यात सत्ता बदल झाला. परंतु भाजपचे नेते कोट्यावधीचा निधी आल्याचे सांगतात मग शिवसेनेमुळे निधी आल्याचे का सांगत नाहीत? असा प्रश्न शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अशोक चौंडे यांनी उपस्थित केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. राम सातपुते यांना समर्थन देण्यासाठी शिवसेनेची बैठक येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, अमोल शिंदे, भाजपाचे संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, अॅड. सुजित कदम, दत्तात्रय सावंत, शहराध्यक्ष प्रतिक किल्लेदार, रामचंद्र जाधव, संजय गेजगे, स्वप्निल निकम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी तालुकाध्यक्ष अशोक चौंडे यांनी निधी मिळवल्याचा भाजप नेते दावा करत असले तरी त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चे योगदान नाकारता येत नाही. परंतु त्यांचे नाव घेताना टाळले जात असल्याची तक्रार केल्यानंतर पालकमंत्री निरूत्तर झाले.

याशिवाय जिल्हा नियोजन मंडळ मधून मिळणाऱ्या निधीमध्ये शिवसेनेला देखील त्यामध्ये वाटा द्यावा व विश्वासात घेतले जावे अशी भूमिका मांडली. यावर शिवसेनेला विश्वासात घेतले जात असल्याचे सांगण्यात आले. संपर्क प्रमुख शिवाजी सावंत म्हणाले की, आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून भाजपचे उमेदवाराला विजय करण्यासाठी जिवाचे रान करू, मात्र निधी देताना व विकास कामांमध्ये आम्हालाही त्यामध्ये वाटा मिळावा वाटा द्यावा, अशी सूचना केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभेसाठी भाजप उमेदवाराला विजयी करण्यासाठी शिवसेनेचे योगदान राहणार आहे. भविष्यात निधी व कामे देताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील विश्वासात घेऊ, सगळ्यांनी मिळून लोकसभेत भाजप उमेदवाराला चांगली मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आ. समाधान आवताडे यांनी पंतप्रधानपदी मोदी यांना पुन्हा संधी देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करत या मतदारसंघात त्यांच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात निधी मिळवल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com