Mangalwedha News : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवेढेकरांची निराशा

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवेढ्याच्या रखडलेल्या प्रश्नासाठी निधीची तरतूद न झाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांतून निराशाजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Maharashtra Vidhimandal
Maharashtra VidhimandalSakal

मंगळवेढा - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवेढ्याच्या रखडलेल्या प्रश्नासाठी निधीची तरतूद न झाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांतून निराशाजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दुष्काळी तालुक्याचा पाणीप्रश्न राजकीय पटलावर गेली अनेक वर्ष चर्चेत राहिलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न अद्यापही मार्गी लागला नाही. आ. समाधान आवताडे यांनी प्रयत्न करत हा प्रस्तावावर मुख्यमंत्र्याची सही करून मंत्रालय बैठकीसाठी ठेवला तर महात्मा बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न देखील 2021 ला तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी आवश्यक त्या निधीची घोषणा केली.

प्रत्यक्षात मात्र एक रुपया देखील निधी या कामासाठी अद्याप खर्ची पडला नाही. त्यामुळे स्मारकाचा प्रश्न देखील शासन दरबारी लटकला. अशात तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व आ. समाधान आवताडे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत व्यापाऱ्यांशी समन्वय ठेवून 25 कोटीचा संत चोखोबा स्मारकाचा सादर केलेला प्रस्ताव देखील प्रलंबित आहे.

पाण्याचा प्रश्न मार्गी लागला तर या भागातील दुष्काळ हटण्यास मदत होणार आहे. तर संत चोखोबा व महात्मा बसवेश्वर स्मारकामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी आल्याने तालुक्याच्या उत्पन्नाला आर्थिक हातभार लागणार आहे. शिवाय दुष्काळाच्या ट्रिगर वन मध्ये देखील मंगळवेढ्यास संधी मिळाली नाही नुकत्याच झालेल्या रिद्धी सिद्धी गणेश मंदिरामुळे तालुक्याच्या वैभवात भर पडली असतानाच प्रास्ताविक दोन स्मारके झाले.

तर त्यामध्ये आणखीन भर पडणार आहे. असे असताना यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोट निवडणुकीतील पराभूत गट व विजय गट सत्तेत असल्यामुळे हे रखडलेले प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. परंतु, यामध्ये या प्रश्नासाठी निधीची तरतूद झाली नसल्यामुळे निराशा पसरली.

तालुक्यातील महात्मा बसवेश्वर व चोखोबा स्मारक, 24 गाव उपसा सिंचन योजनेस अर्थसंकल्पामध्ये निधी ची तरतूद झालेली नाही, तरीही पुरवणी अर्थसंकलपामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून तरतुद करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.

- अजित जगताप, राष्ट्रवादी

अर्थसंकल्पात जिल्हास भोपळा मिळाला, विमानतळासाठी सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडली परंतू बजेट मध्ये निधी दिला नाही. मंगळवेढ्यातल्या उपसा सिंचन योजनेसाठीही निधी नाही, २४ गावाने कर्नाटक राज्यात जाण्याचा व लोकसभा निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील उपसासिचंन योजनेस निधी मिळवण्यात अपयशी ठरले. तसेच महात्मा संत बसवेश्वरांचे व चोखोबा स्मारकासह पंढरपूर विकासाला निधी तरतूद नाही, आमदार सत्ताधारी असून निधी दिला जात नाही त्यामुळे आमदाराना किती किमंत आहे हे ह्यावरुन स्पष्ट होते.

- अभिजीत पाटील, चेअरमन श्री विठ्ठल सह. साखर

काँग्रेसने मंजुरी दिलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस अद्याप निधीची तरतूद नाही.तालुक्यातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेचे सरकार सत्तेत आणणे गरजेचे बनले आहे निधी न दिल्याने तालुक्यावरील सरकारचा किती राग आहे यावरून स्पष्ट होते

- प्रशांत साळे, तालुकाध्यक्ष काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com