Mangalwedha News : थातुर मातुर उत्तरे न देता, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवा - आ.आवताडे

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर आज आ. समाधान आवताडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली.
MLA Samadhan Autade
MLA Samadhan Autadesakal
Summary

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर आज आ. समाधान आवताडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली.

मंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्याच्या वीज प्रश्नावर आठ दिवसात तोडगा काढावा त्यावर थातूरमातूर उत्तरे न देता योग्य तो साक्षमोक्ष लावावा अन्यथा पुन्हा पंधरा दिवसात बैठक घेवू असा इशारा आ.समाधान आवताडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर आज आ. समाधान आवताडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, महापारेषणचे अधीक्षक अभियंता शेळके, कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता बी. ए. भोळे,उपकार्यकारी अभियंता बी.डी. चोरमुले, भाजपा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, सोमनाथ अवताडे, प्रमोद म्हमाणे, धनंजय पाटील, सुरेश भाकरे, राजन पाटील, रावसाहेब फटे, सुदर्शन यादव समाधान हेंबाडे आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. अवताडे म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज समस्या मोठ्या प्रमाणात आहेत त्या तात्काळ सोडवण्यात याव्यात यामध्ये शेतकरी व वीज ग्राहकाचे आर्थिक पिळवणूक होऊ नये. मी कुणाच्या एक रुपयाच्या देखील मिंध्यात नाही जर असलो तर त्या दिवशी राजकारण सोडेन असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी कशा कमी करता येईल याकडे लक्ष द्यावे व शेतकऱ्यांवर अन्याय व लूट होणार नाही याची काळजी देखील घेण्याचे सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर म्हणाले की, शंभर ते तीनशे मीटर च्या कनेक्शन धारकाची यादी ठेकेदाराकडे देण्याअगोदर त्या त्या ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात यावी. मंजूर लाभार्थ्यांना मोबाईलवर मेसेज यावेत.

आसबेवाडी येथील शेतकऱ्यांनी कमी कनेक्शनधारकाला जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवले जातात व जास्त कनेक्शन धारकाला कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवले जात असलेली तक्रार केले. प्रहारचे समाधान हेंबाडे यांनी नवीन कनेक्शन धारकाला सहा महिने मीटर दिला जात नाही. काही वेळेस खाजगी दुकानातून मीटर विकत घेण्याची सूचना दिल्या जातात. मीटरसाठी आर्थिक होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी. दोन ट्रान्सफार्मरवरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीच वीज पुरवठा होणे दृष्टीने व्यवस्था केली.

नंदुर येथील परमेश्वर येणपे यांनी 33 के.व्ही सब स्टेशनचे काम रखडले आहे. ते तात्काळ पूर्ण करावे.बठाण येथील बिभीषण बेदरे यांनी मीटर दिले असताना अवातस्व वीज देण्यात येत असल्याचे सांगितले, भाळवणी येथील महादेव साखरे यांनी महावितरणचे कर्मचारीच विजेचे तारा काढून विकत असल्याच्या तक्रारी केली, तर वसंत गायकवाड या शेतकऱ्याच्या शेतीपंपाचे मंजूर पोलपैकी तीनच पोल उभा केल्यात बाकीचे पोल उभा केले नाहीत त्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार केली.

भोसे येथील अशोक भगरे यांनी महावितरणच्या चुकीमुळे बेदाणा शेडचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई अद्याप दिली नसल्यामुळे मला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला.डोणज येथील अशोक केदार यांनी मंजूर असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे काम करीत नसल्याची तक्रार केली. हुन्नूर येथील 33 सब स्टेशनला पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याची तक्रार शिवाजी कोरे यांनी केली. एकूणच आज महावितरणच्या कारभाराबाबत सर्वाधिक तक्रारी आ. समाधान आवताडे यांच्या निदर्शनास आल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहातील वाढती गर्दी लक्षात घेता आ. आवताडे यांना विश्रामगृहाच्या बाहेर बैठक घ्यावी लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com