Mall Fire : मॉलला आग; दोघा तरूण उद्योजकांच्या स्वप्नाचा चुराडा, अनेक बेरोजगार

मंगळवेढा शहर व तालुक्यातील लोकांना कमी दरातील मालाबरोबर अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करून देणारा 'खटावकर मॉल' आज आगीच्या भक्षस्थानी पडला.
khatavkar Mall Fire
khatavkar Mall Firesakal

मंगळवेढा - शहर व तालुक्यातील लोकांना कमी दरातील मालाबरोबर अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करून देणारा 'खटावकर मॉल' आज आगीच्या भक्षस्थानी पडला. यामध्ये कोट्यावधीच्या साहित्याची राख झाली.तर दोन तरुण उद्योजकांच्या स्वप्नाचाही चुराडा झाला. या घटनेने मंगळवेढ्याच्या सोशल मीडियामध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पंढरपूर रोडवर पिंटू खटावकर आणि सुहास ताड या दोन तरुण उद्योजकांनी तालुक्यातील लोकांना स्वस्त दरात चांगल्या प्रतीचा किराणा माल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लहान मुलांची खेळणी,कपडे व इतर इतर मागेल ती वस्तू खटावकर मॉलच्या माध्यमातून उपलब्ध केली.

शहर, ग्रामीण भाग व शेजारच्या तालुक्यातून येणार जाणारे लोक या मालाची खरेदी साठी थांबू लागले .त्यामुळे या परिसरात नवनवीन व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्याने या परिसरात नवीन दुकाने थाटली. परंतु आज सकाळी आठच्या दरम्यान या मॉल मधून कसला तरी धूर येत असल्याची येत असलेल्या दिसतात तात्काळ त्या दोन मालकांना याबाबतची कल्पना दिली.

या ठिकाणी मंगळवेढा नगरपालिका व दामाजी कारखाना येथील अग्निशामक बंब प्राचारण करण्यात आले. परंतु बघता आगीचे लोट वाढल्यानंतर आग आटोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली नसताच त्यानंतर सांगोला, पंढरपूर नगरपालिका, सोलापूर महानगरपालिका, विठ्ठल व पांडुरंग साखर कारखान्याचे अग्निशामक बंब बोलण्यात आले.

या आगीचे घटना व धुराचे लोट पाहताच शहर व तालुक्यातील लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. तहसीलदार मदन जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम, यांनी मंगळवेढ्याच्या पोलीसाबरोबर पंढरपूरचा ज्यादा पोलीस बंदोबस्त पाचारण करून नागरिकांना आत येण्यास मज्जाव करण्यात आला.

सकाळी साडेआठ पासून अग्निशामक दलाचे प्रयत्न रात्री सात वाजेपर्यंत सुरू होते. अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे या मॉलपासून लगत असणाऱ्या अनेक दुकानांचा बचाव करण्यात यश आले.

सोशल मीडियातून तरूण उद्योजकाबद्दल हळहळ

या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताच मंगळवेढ्याचे तरुण उद्योजकांनी बँकेचे आर्थिक सहाय्य घेऊन हा मॉल उभारला मॉल सुरू होताच काही महिन्यात कोरोनाचे संकट आले. अशा सर्व संकटावर मात करत मंगळवेढा पंढरपूर रोडवर शहराचे नावलौकिकासाठीच्या प्रयत्नाचे कौतुक करताना या आगीच्या घटनेने त्यांना पुन्हा या उद्योगात सावरण्याची संधी मिळो अशा पद्धतीची प्रार्थना सोशल मीडियातून केल्या जात होत्या.

या मॉलच्या निमित्ताने सत्तरहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला माल देणे, माल लावणे, बिल तयार करणे, सुरक्षारक्षक, माल पोच, यास अनेक स्त्री व पुरूषांना कायमस्वरूपी काम सुरू होते त्यामुळे या तरुणांना आता बेरोजगार व्हावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com