Abhijit Patil : एकत्र आलो म्हणून तसलं काय नाय, तुम्ही चांगले मताधिक्य द्या, की समोरच्याचं तिकीटच कापलं पाहिजे

माझी उमेदवारी शरद पवारांनी निश्चित केली, आज आम्ही एकत्र आलो म्हणून तसलं काय नाय, तुम्ही चांगले मताधिक्य द्या.
Abhijit Patil
Abhijit Patilsakal

मंगळवेढा - माझी उमेदवारी शरद पवारांनी निश्चित केली, आज आम्ही एकत्र आलो म्हणून तसलं काय नाय, तुम्ही चांगले मताधिक्य द्या, की समोरच्याचं तिकीटच कापलं पाहिजे असे आवाहन विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.

लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, प्रांतिक सदस्य राहुल शहा, विठ्ठलचे अध्यक्ष अभिजित पाटील, विधानसभा कार्याध्यक्ष मुजम्मिल काझी, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, आण्णा शिरसट, माणिक गुंगे, संगीता कट्टे, विजय खवतोडे, सुरेश कट्टे, संदीप बुरकुल, जमीर इनामदार, ज्ञानेश्वर भंडगे, महादेव शिंदे, दामाजी माने, काशीनाथ सावंजी, विशाल खटकाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, सध्याच्या निवडणुकीत नेमके विषय काय त्याचे नियोजन करून बुथ मजबूत करण्याची गरज आहे. जिल्ह्यात सत्ता केंद्राच्या माध्यमातून आपल्या गरजा भागविणारे मोहिते-पाटील परत राष्ट्रवादीत आले. राम मंदीर पुर्ण केल्याचा दावा करत असले तरी राम एक वचनी होता पण यांनी जाहीर केलेले 15 लाख दिले नाही, दरवर्षी 2 लाख नोकऱ्यांचे वचन पाळले नाही.

सध्या सोलापूरात आठ दिवसांत पाणी नाही, 10 वर्षात काय केले याचे उत्तर शोधण्याची वेळ आली. निवडक उद्योजकाचे 16 लाख कोटी माफ केले.2014 व 2019 सोशल मीडियातून मोदीच्या जाहीरातीच मात्र आता सोशल मीडिया लोक विरोध करून लागले. उपमुख्यमंत्री फडणवीस काल मंगळवेढा उपसा जलसिंचनवर चकार शब्द बोलले का? विद्यमान भाजप खासदाराने पाच वर्षात 39 लाख खासदार निधी खर्च केला.

उलट त्यांच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याची तंबी देत विधानसभेची उमेदवारी कापण्याचा इशारा दिला. त्यांचे तिकीट कसं कापता येईल,यासाठी प्रयत्न करावेत.तर आपल्याला रान मोकळे होईल. जिल्हाध्यक्ष बळीराम साठे म्हणाले की,दहा वर्षात देशातील वातावरण खुनशी प्रवृत्तीचे झाले. पंतप्रधान मोदीनी वाटेल ते नियम वाटेल ते कायदे लावले, ईडी लावून भितीचे वातावरण निर्माण केले, औरंगजेब काळात जिझीया कर होता.

तशी जी एसटी लावून चुकीच्या पध्दतीने कारभार सुरू केला. या निवडणुकीत उठाव न केल्यास भविष्यात या देशात हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नाही. एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत,भाजपाला बहुमतापासून दूर ठेवले तर, लोकशाही टिकेल. राहूल शहा म्हणाले की, मोदी सरकारच्या कारभारावरील राग मतपेटीतून व्यक्त होणार आहे.

आघाडी उमेदवार सक्षम असून यंदाच्या निवडणुकीत बदल घडवायाचा आहे. महेश माने म्हणाले पुण्यात अभाविपच्या माध्यमातून तरूणाच्या माथी भडकावय्रानी सोलापूरात येवून शिकवू नये. त्यांचे पार्सल बीडला नाही गुजरातला पाठवा, सुत्रसंचालन राजेंद्रकुमार जाधव यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com