Mangalwedha News : निमित्त गाव भेटीचे, पण तयारी लोकसभेची

आ. प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने तालुक्याच्या 32 गावांचा दौरा दोन टप्प्यात केला पूर्ण.
MLA Praniti Shinde
MLA Praniti Shindesakal

मंगळवेढा - लोकसभा निवडणूक व भाजपाचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसताना देखील आ. प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने तालुक्याच्या 32 गावांचा दौरा दोन टप्प्यात पूर्ण केला. निमित्त जरी गावभेट दौऱ्याचे असले तरी यातून लोकसभेच्या प्रचाराची पहिली फेरी केली.

लोकसभा निवडणुकीतील सलग दोन पराभवाने सावध झालेल्या काँग्रेस पक्षाने यंदा सावध पावले टाकण्यास सुरुवात केली सध्या काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून आ. प्रणिती शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यात काँग्रेसचे राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली तालुक्यामध्ये दुष्काळाची भीषण तीव्रता असल्याने जनावराच्या चाऱ्यासह पिण्याच्या व शेतीचे पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

39 गावाची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालू असले तरी या योजनेचे पाणी अवेळी येत आहे. पाणी पुरवठ्यामध्ये योग्य समन्वयाचा अभाव आहे. रखडलेला पंढरपूर विजयपूर रेल्वे मार्ग जनावराच्या चाऱ्याची टंचाई आहे. याशिवाय मजुरांच्या हाताला काम, बेरोजगारीसह विकास कामाचा प्रश्न उभा असताना दुष्काळी निकषातून मंगळवेढ्याला वगळल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

आ. प्रणिती शिंदे यांना 24 गावातील काही पदाधिकाऱ्यांनी या प्रश्न लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी त्याबाबतचा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करून प्रत्यक्ष पाहण्यासाठी या गावाचा दौरा केला. त्या दौऱ्यामध्ये पाटकळ येथे पाणी प्रश्न व मराठा आरक्षणावरून स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले असले तरी इतर गावात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, जिल्हा कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, पांडुरंग जावळे, विष्णुपंत शिंदे, मनोज माळी, अॅड रविकिरण कोळेकर,राजेंद्र चेळेकर ,सुरेश कोळेकर, संदीप पवार, शिवशंकर कवचाळे, मारुती वाकडे, दिलीप जाधव,अजय अदाटे ,जयश्री कवचाळे,शाहीन शेख यांच्या पुढाकाराने पहिली फेरी पूर्ण झाली.

या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यात मी एकमेव विरोधी आमदार आहे. माझ्याकडे कोणती संस्था किंवा कारखाने नसल्यामुळे ईडीची भीती नाही त्यामुळे मी तुमचे प्रश्न नीटपणे आणि अभ्यासू पद्धतीने मांडू शकते. असे सांगून माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे. एखादा विषय मी चांगल्या पद्धतीने मांडताना राजकारणापेक्षा मला समाजकारणामध्ये अधिक रस असले सांगत लोकांचा कौल व प्रश्न जाणून घेण्यात त्या तुर्त तरी सत्ताधाय्रापेक्षा सरस ठरल्या आहेत.

गाव भेट दौऱ्यात राईनपाडा हत्याकांड नातेवाईकांनी नोकरीची मागणी सरकारने पूर्ण केली नाही. भोसे येथे रेशनचा माल मिळत नाही, खरीप व रब्बीचा पीक पिक विम्यात महसूल मंडळ वगळणे, रस्ते, दुष्काळी परिस्थितीत शेती पंपाला दिवसा वीजपुरवठा करणे, नीट परीक्षा, मंगळवेढा शिवारातील कडबा दुष्काळी गावाला वाटप करणे इतर अन्य प्रश्नांची देखील मागणी या दौऱ्यात करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com