आ. आवताडेच्या प्रयत्नाने वीजेच्या 110 ट्रान्सफार्मरसाठी 6 कोटी 49 लाखाचा निधी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mp samadhan autade

Mangalwedha News : आ. आवताडेच्या प्रयत्नाने वीजेच्या 110 ट्रान्सफार्मरसाठी 6 कोटी 49 लाखाचा निधी मंजूर

मंगळवेढा - पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील शेतीपंपाला पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून आ. समाधान आवताडे यांनी केलेल्या प्रयत्नातून डीपीडीसी मधून 110 नवीन व अतिरिक्त ट्रान्सफार्मर साठी जिल्हा नियोजन समितीकडून 6 कोटी 49 लाख रुपये निधी मंजूर झाले असून, सत्ताबदलानंतर मतदारसंघात येणाय्रा निधी टक्का वाढला आहे. वीजेसाठी निधी मंजूर झाल्यामुळे शेतीसाठी वीजेची कटकट कमी होवून पुरेशा दाबाने वीजपुरवठा होणार आहे.

आ. समाधान आवताडे यांनी सहा महिन्यापुर्वी केलेल्या गावभेट दौय्रात तालुक्यात सर्वाधिक तक्रारी या रस्ते, वीज आणि पाणी यावर होत्या. याबाबत त्यांनी केंद्र व राज्य स्तरावर केलेल्या प्रयत्नातून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील रस्त्यासाठी मोठया प्रमाणात निधी मंजूर झाला. असतानाच आता तालुक्यातील शेतकय्रांला पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून नवीन व अतिरिक्त ट्रान्सफार्मरची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. आ. आवताडे यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या रखडलेल्या वीजेच्या कामासाठी निधी मिळणार असल्याने बागायत क्षेत्राबरोबर जिरायत शेती करणाय्रा शेतकय्राला या निधीमुळे फायदा होणार आहे.

नवीन ट्रान्सफार्मर पुढीलप्रमाणे - पंढरपूर शहर 11, गादेगांव 2, कोर्टी 3, वाखरी 4, लक्ष्मी टाकळी 3 डीपी, कासेगाव 2, बोहाळी 1, उंबरगाव 2, खर्डी 3, तपकीरी शेटफळ 1, तनाळी 1, मंगळवेढा शहर 12, आंधळगाव 7, खुपसंगी 2, गणेशवाडी 1, कचरेवाडी 1, लोणार 3, भोसे 3, नंदेश्‍वर 2, जालिहाळ 1, कात्राळ 1, हुलजंती 3, कागष्ट 2, येळगी 1, नंदूर 1, देगांव 3, धर्मगांव 1, गुंजेगाव 1, घरनिकी 1, शिरसी 1, शेलेवाडी 1, लक्ष्मी दहिवडी 1, सलगर बु.1, सलगर खु.1, येळगी 1, मरवडे 1, कात्राळ 2, अरळी 2, डोणज 1, चिक्कलगी 2, रड्डे 2, लवंगी 1, माचणूर 2, दामाजीनगर 1, उचेठाण 2, बठाण 1, लोणार 3, अरळी 2, बालाजीनगर 2, सिद्धापूर 1.

मतदारसंघात नवीन व अतिरिक्त ट्रान्सफार्मरसाठी आ. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 6 कोटी 49 लाख रुपये निधीमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकर्‍यांना अपुर्‍या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा मिळणार आहे. भविष्यात पुरेशा दाबाने वीजपुरवठा होणार असल्याने शेतीतील उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

- दत्तात्रय साबणे, नंदेश्‍वर