Mangalwedha News : अल्पवयीन मुलांसाठी पोलीस काका व पोलीस दीदी राबवणार उपक्रम - पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे

अल्पवयीन मुले व मुली यांचे घर सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. हे थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पोलीस काका व पोलीस दिदी हा उपक्रम राबविण्यात येणार.
Shirish Sardeshpande
Shirish Sardeshpandesakal

मंगळवेढा - अल्पवयीन मुले व मुली यांचे घर सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. हे थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पोलीस काका व पोलीस दिदी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी व्यक्त केले.

गणेशोत्सव व ईद-इ-मिलादच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील शांतता कमिटीची बैठक जोगेश्वरी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली. व्यासपीठावर अप्पर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जून भोसले, तहसीलदार मदन जाधव, पोलीस निरीक्षक रणजित माने, अनंत कुलकर्णी आदीसह पोलीस अधिकारी शांतता कमिटीचे सदस्य, पोलीस पाटील, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस अधिक्षक सरदेशपांडे म्हणाले की, उत्सव काळात डिजेच्या जास्त आवाजावर मंडळाने विचार करावा काही तासाच्या आनंदापेक्षा लहान बालके, वयोवृद्ध याचा विचारदेखील महत्त्वाचा असल्याने जास्त आवाजाच्या डीजे वर कारवाई करण्याचा इशारा देत मिरवणूक काळात दारू विक्री बंद ठेवण्याचा प्रस्ताव पाठवला असून, शहर व ग्रामीण भागातील पर्यावरण पुरक मंडळाचा व जातीय सलोखा निर्माण करणाऱ्या व्यक्ती, पोलीस पाटील यांचा गौरव करण्यात येणार आहे.

मंगळवेढ्यातील सर्व धर्मीयातील जातीय सलोखा कौतुकास्पद असून, येणारे सण चांगल्या पध्दतीने साजरे करावेत. अप्पर पोलीस अधिकारी हिंमतराव जाधव म्हणाले की, मंगळवेढ्यातील सांप्रदायिक एकोपा अन्यत्र कुठेही पाहण्यास मिळत नाही. ही परपंरा कायम ठेवावी. गणेशोत्सव काळात मंडपाची व्यवस्था चांगली करावी, अधिकृत वीज जोडणी करावी. उत्सव आपल्या आनंदासाठी असतात, वर्गणीतून अनेक विधायक कामे करण्यासाठी पुढाकार घ्यावा. देखावे प्रबोधनात्मक करण्यावर भर द्यावा.

पोलीसांकडून कुणालाही त्रास होणार नाही. मंडळाना परवाने घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येईल. रात्र गस्तीच्यावेळी मंडळाचे कार्यकर्ते जागे असावेत. या बैठकीत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आपला आनंद साजरा करताना इतरांना त्रास होवू नये याची काळजी घ्यावी.

मोठ्या आवाजावर रात्री 10 नंतर निर्बंध घालावेत. शहरातील अवजड वाहतूक रोखण्यासाठी लोकसभागातून कमान उभी करावी. दामाजीचे संचालक औदुंबर वाडदेकर यांनी गणेशोत्सवासाठीचे परवाने एकाच ठिकाणी मिळावेत अशी सुचना केली. फिरोज मुलाणी यांनी नगरपालिकेचे कामकाज रामभरोसे असून मिरवणूक मार्गावरील विजेच्या तारा, धोकादायक झाडे काढून मिरवणूक मार्गावरून खड्डे बुजवण्यासंदर्भात सुचना नगरपालिकेना द्याव्यात अशी मागणी केली.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष अॅड. राहूल घुले यांनी एक गाव एक गणपती योजनेस प्रोत्साहन देवून ज्यांनी यात योगदान देणाऱ्यांचा सन्मान करावा. नारायण गोवे यांनी शहरातून अवजड वाहतूक बंद ठेवण्याची मागणी केली. यावेळी अॅड. रमेश जोशी, मंडप असोसिएशन यावेळी सुचना केल्या.

शहरातील अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यानी निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी 15 दिवसाच्या आत करावी, अशी सुचना केली. पोलीस निरीक्षक रणजीत माने त्यांच्यावरील तक्रारीनंतर त्यांना पुन्हा मंगळवेढा पोलीस स्टेशन पोलीस ठाण्याचा पदभार दिल्याचे सांगून त्यांच्या चांगल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले व काही सूचना देखील दिल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com