

Mangalwedha: Farmer Siddheshwar Metkari undertaking an indefinite hunger strike outside the Sub-Divisional Office, protesting the alleged acquisition and repeated allotment of his agricultural land without compensation.
Sakal
मंगळवेढा : जिल्हा पुनर्वसन खात्याच्या मनमानी आणि संशयास्पद कारभारामुळे मंगळवेढ्यातील गरीब शेतकऱ्यावर देशोधडीला लागण्याची वेळ आली.सिध्देश्वर मेटकरी शेतकऱ्याच्या मालकीच्या एकूण ८ एकर शेतजमिनीपैकी तब्बल ३ एकर जमीन जिल्हा पुनर्वसन खात्याने शेतकऱ्याला कोणतीही पूर्वकल्पना व मोबदला न देता, परस्पर संपादित करून तिचे वाटप व विक्री करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. या अन्यायाविरोधात बाधीत शेतकऱ्याने थेट प्रांत कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनापासून आमरण उपोषण सुरू केले.