कलाकार विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मंगळवेढ्याची संतनगरी असुरलेली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलाकार विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मंगळवेढ्याची संतनगरी असुरलेली

2017 नंतर मंगळवेढ्यात होणाय्रा 2 ऱ्या युवा महोत्सवाचे 57 महाविद्यालयांनी विविध कला प्रकारामध्ये सहभाग घेतला असून, यंदा पावसातही हा युवा महोत्सव तरूणाईला पाहता येणार आहे.

कलाकार विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मंगळवेढ्याची संतनगरी असुरलेली

मंगळवेढा - उद्यापासून सुरू होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उन्मेष सृजनरंगाचा या 18 युवा महोत्सवासाठी येथील दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणातील तयारी पूर्ण झाली असून कलाकार विद्यार्थ्यांसाठी स्वागतासाठी मंगळवेढ्याची संतनगरी असुरलेली आहे

2017 नंतर मंगळवेढ्यात होणाय्रा 2 ऱ्या युवा महोत्सवाचे 57 महाविद्यालयांनी विविध कला प्रकारामध्ये सहभाग घेतला असून, यंदा पावसातही हा युवा महोत्सव तरूणाईला पाहता येणार आहे. 2017 साली झालेल्या पावसामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झाल्यामुळे शहरवासीयांना विद्यार्थ्यांच्या कलेचे सादरीकरण पाहता आले नाही. व विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या कलेचे सादरीकरण करता आले नाही.

यंदा मात्र पूर्ण व्यासपीठ वॉटरप्रूफ केले असल्यामुळे सर्व कार्यक्रम पावसात देखील पाहण्याची सोय सोलापूर विद्यापीठाबरोबर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम यांच्या प्रयत्नाने उपलब्ध केली. युवा महोत्सवाच्या स्टिकरचे उद्घाटन पक्षनेते अजित जगताप यांच्या हस्ते संस्था अध्यक्ष अॅड. सुजित कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. महाविद्यालयातील प्रांगणात मुख्य रंगमंच सह, इतर रंगमंच, भोजन व्यवस्था, स्वागत कमान उभारण्यात आली असून, 57 महाविद्यालयातील सुमारे 2000 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतील अशी व्यवस्था करण्यात आली. शाळेचा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद केला आहे. तरुणाईला आकर्षण करणारे सेल्फी पॉईंट, महोत्सवाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्टॉलच्या माध्यमातून खाद्य पदार्थासह इतर सुविधा उपलब्ध करून दिली.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोफत औषध उपचार केंद्र उभारण्यात आले असून, खाजगी सुरक्षा रक्षकासह पोलीस बंदोबस्त तैनात केला.संत नगरी असलेल्या मंगळवेढ्यात युवा महोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरांमध्ये असलेल्या संत चोखामेळा, दामाजीपंत, कान्होपात्रा, गोपनबाई विहीर, भुईकोट किल्ला तेराव्या शतकातील महादेव मंदिर गैबीपीर दर्गा ही ठिकाणी देखील पाहता येणार आहेत. त्यामुळे नवरात्र महोत्सवा नंतर आता पुन्हा युवा महोत्सवाच्या निमित्ताने मंगळवेढ्यात निर्माण होणाऱ्या गर्दीतून इथल्या व्यवसायिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

आज सायंकाळी विद्यापीठाच्या प्रमुख समितीने सायंकाळी मैदानाची पाहणी केली असून, उद्या सकाळी दहा वाजता उद्घाटन आ. समाधान आवताडे, आ. शहाजी बापू पाटील, मा. आ. प्रशांत परिचारक यांची प्रमुख उपस्थिती असून अध्यक्षस्थानी कुलगुरू मृणालिनी फडणवीस या असणार आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते होणार आहे. सध्या राजकीय वातावरणात आ. शहाजी पाटील यांच्या माणदेशी भाषेने सर्वांनाच भुरळ घातली आहे. त्यांचा पुन्हा एकदा रांगडी आवाज उद्याच्या युवा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना ऐकावयास मिळणार आहे.

या युवा महोत्सवामध्ये 57 महाविद्यालयातील 700 विद्यार्थी व 600 विद्यार्थीनी मिळून 29 कलाप्रकार सादर करणार असून या कलेच्या परीक्षणासाठी राज्यभरातील 40 परीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. नऊ ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये 114 संघप्रमुख असून महोत्सव समितीचे 25 प्रमुख या सोहळ्या युवा महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत.

- डॉ. केदारनाथ काळवणे,संचालक विद्यार्थी विकास विभाग