Mangalwedha News : तालुक्यासाठी काहीच केलं नसेल त्यांना परत का संधी द्यायची? - प्रणिती शिंदे

दोनदा संधी देऊन तालुक्यासाठी काहीच केलं नसेल त्यांना परत का संधी द्यायची? असा प्रश्न आ. प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.
MLA Praniti Shinde
MLA Praniti ShindeSakal

मंगळवेढा - दोन वेळा सत्ता मिळूनही देखील मंगळवेढाच्या विकासासाठी केलेल्या पाच गोष्टी सांगा. दोनदा संधी देऊन तालुक्यासाठी काहीच केलं नसेल त्यांना परत का संधी द्यायची? असा प्रश्न आ. प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.

येथील काँग्रेस कार्यालयात 24 गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणीप्रश्नी बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, सुनजय पवार, अॅड. नंदकुमार पवार, दिलीप जाधव, मारूती वाकडे, फिरोज मुलाणी, दादा पवार, अर्जुनराव पाटील, अमर सुर्यवंशी, नाथा ऐवळे, मनोज माळी, रविकिरण कोळेकर, पांडुरंग माळी, पांडुरंग जावळे, विष्णुपंत शिंदे, बापू अवघडे, आयेशा शेख, जयश्री कवचाळे, सुनिता अवघडे, आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. शिंदे म्हणाल्या की, मी लहानपणापासून सत्ता उपभोगली आहे. सत्तेसाठी व टक्केवारीसाठी राजकारण मला करायचे नाही. सत्तेपेक्षा लोकांचे प्रश्न महत्वाचे आणि तेच मला आव्हान वाटतात शासनाने स्मार्ट सिटी करण्यापेक्षा स्मार्ट गावे करण्यासाठी पुढाकार घेतला असता तर अधिक चांगले वाटले असते.

काँग्रेसचे विचार सध्या कोणी मारू शकत नाही, इतर कामासाठी कोट्यावधी खर्च होताना पाणी देण्यासाठी शासनाकडे किरकोळ बाब आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले. यापूर्वी पाण्याचा प्रश्न अनेकदा प्रश्न उपस्थित केला होता परंतु विषय अर्धवट घ्यायचा नव्हता म्हणून मी त्यामध्ये लक्ष घातले नाही. अर्धवट माहितीवर प्रश्न मांडला असता तर अर्धवट पाणी मिळाले असते.

निवडणूक असो वा नसो मी या भागातील पाण्यासाठी प्रयत्न करताना येणाय्रा अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर आवाज उठविणार आहे. सत्ताधाय्राकडून धर्म -जातीची खेळी मांडली जाते कामासोबत धर्मजात महत्वाचा आहे. मात्र धर्म- धर्म करून लोक उपाशी मरतील, पुरोगामी देश सध्या काळात मागे चालला.

पाणी परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांनी मंगळवेढ्याने पाणी चळवळीत दिलेल्या योगदानाची माहिती देत गेले अनेक वर्षापासून या योजनेला मंजुरी दिली. प्रत्यक्षात पाणी येण्यास मात्र विलंब होत असल्याचे सांगितले. तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी कमी दाबाने मिळत आहे. आमच्या आजोबापासून या भागाला पाणी येणार असे ऐकतो मात्र प्रत्यक्षात पाण्याचा विषय अद्याप मार्गी लागला नाही.

दुष्काळ निधी गारपीट पिक विमा या गोष्टी देखील मंगळवेढ्याला सातत्याने अन्याय केला जात असून या प्रश्नी लक्ष घालावे अशी विनंती केली. प्रास्ताविक युवकचे तालुकाध्यक्ष अॅड. रविकरण कोळेकर यांनी केले. अॅड. नंदकुमार पवार, फिरोज मुलाणी, माधवानंद आकळे, बिरुदेव घोगरे, लक्ष्मण गायकवाड यांची भाषणे झाली. उपस्थितांचे आभार मनोज माळी यांनी मानले.

महाविकास आघाडीला सर्वे रिपोर्ट मध्ये मताधिक्य मिळण्याची शक्यता असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते पळविण्याचे काम सत्ताधाय्राकडून सुरू असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबणीवर टाकली जात आहे. सर्वे रिपोर्टमुळे सत्ताधारी घाबरलेले आहेत असा आरोप आ. प्रणिती शिंदे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com