Solapur news : 'मंगोलियाचे पाहुणे पक्षी मंगळववेढ्यात..'

ब्राह्मणी बदक या नावानेही ओळखले जाणारे स्थलांतरीत बदके सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे दाखल झाल्याचे चित्र दिसत आहे.
Rhudy shelduck
Rhudy shelducksakal
Summary

ब्राह्मणी बदक या नावानेही ओळखले जाणारे स्थलांतरीत बदके सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे दाखल झाल्याचे चित्र दिसत आहे.

ब्रह्मपुरी (सोलापूर) - जिल्ह्यात परतीच्या पावसाच्या धुमाकुळामुळे जिल्ह्यातील सर्वच जलस्थाने तुडुंब भरल्याने स्थलांतरित पक्ष्यांचा चराऊ भाग पाण्याने आच्छादित झाल्याने परदेशी पाहुणे पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडले होते. त्यातच मागील आठवड्यात मंगळवेढ्यात चक्रवाकांचा समूह दिसल्याने स्थलांतरीत पक्ष्यांच्या आगमनाचे शुभसंकेत मिळाले आहे. त्यामुळे पक्षीप्रेमी, अभ्यासक उल्हासित झाले आहेत.

ब्राह्मणी बदक या नावानेही ओळखले जाणारे स्थलांतरीत बदके जिल्ह्यातील मंगळवेढा येथे दाखल झाल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवेढा शहरवासीयांनी आपले तहान भागवून नाल्यात सोडलेल्या शहराच्या आजूबाजूच्या परिसरात साठून राहिलेल्या डबक्यांमध्ये आठ ते दहा सोनेरी रंगाच्या बदकांचा मुक्त वावर दिसत आहे. रशियाजवळच्या मंगोलिया येथे मूळ वास्तव्याला असलेली ही बदके हिमालयातील मानसरोवर येथे वीण घालतात व दर वर्षी थंडीपासून बचाव करून घेण्यासाठी भारतीय उपखंडातील पठारी भागात हिवाळी पाहुणे म्हणून येतात. हळदीकुंकू या स्थानिक बदकांपेक्षा जरा मोठ्या आकाराचे चक्रवाक अर्थात ब्राह्मणी बदक सोनेरी रंगाचे असतात. भगवा किंवा बदामी रंगाचा सोनेरी पिसारा व केतकी रंगाचे डोके व मान आणि काळी शेपटी अशा रंगसंगती ने सुंदर दिसणारे हे स्थलांतरित पाहुणे पक्षी संतभूमीतील खाद्यावर ताव मारायला आले आहेत. त्यांची चोच काळी व पाय पुसट पांढरे असतात.

नर चक्रवाकाच्या गळ्यात काळा गोफ असतो. ही बदके साठलेल्या पाण्यातील चिखलातील जलकीटकांना लक्ष्य करतात. तसेच अनेकवेळा पाण्याच्या काठावरील गहू, हरभरा, जवस, करडी सारख्या रब्बी पिकांच्या कोवळी खोड-पाने खाऊन उदर निर्वाह करून घेतात. प्रणयीजोडी म्हणून चक्रवाक बदकांची ख्याती आहे. मराठी साहित्यकांनी आपल्या लेखनात चक्रवाकांचा अनेकदा उल्लेख केला आहे. एकदा जमलेली जोडी जीवनभर साथ निभावून राहतात व एनकेन कारणाने एखाद्याचे मरण झाले तर दुसरा पण जीवन त्याग करतो अशी अख्यायिका या बदकांबद्दल आहे. प्रणयक्रीडेत निपुण असलेल्या या बदकांना इंग्रजीत रुडी शेल्डक (Rhudy shelduck) व ब्राह्मणी डक (Brahmany duck)

'वाढत्या शहरीकरण व लोकवस्ती तसेच नव्याने निर्माण होत असलेले दुकान गाळे इत्यादी कारणांमुळे गावालगतचे जलस्थाने धोक्यात आली आहेत. त्यामुळे गेली कित्येक दशके हिवाळ्यात याठिकाणी येऊन पक्षी वैभवात भर पाडणारी ही बदके संकटात सापडत आहेत. स्थानिक पर्यावरण व पक्षीप्रेमीनी पक्ष्यांच्या आल्हाददायक जीवनासाठी त्यांचे अधिवास अधिक सुरक्षित बनवायला पाहिजे.'

- प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक.

'पवित्र संताच्या भूमीत परदेशी पक्षाचे आगमन झाल्यामुळे जिल्ह्यातील पक्षी प्रेमी, अभ्यासक, पर्यटक यांना पर्वणी निर्माण झाली आहे. शहरातील कृष्ण तलाव, खोमनाळ नाका, व बोराळे नाका परिसरात देशी विदेशी पक्षांचे आगमन झाल्यामुळे छायाचित्र संग्रहित करण्यास चांगली संधी प्राप्त झाली आहे.'

- डॉ. विवेक निकम, पक्षी अभ्यासक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com