
"Manipur students singing the Marathi Ganesh Aarti ‘Sukhakarta’ with perfect devotion."
Sakal
सोलापूर: राष्ट्रीय एकात्मताअंतर्गत ज्ञानप्रबोधिनीच्या सोलापूर केंद्रात मणिपूर येथील विद्यार्थी वास्तव्यास आहेत. पूर्व भारतातील मणिपूरच्या त्या मुलांना ना मराठी ना हिंदी भाषा येते. विशेष बाब म्हणजे ते विद्यार्थी अवघ्या तीन दिवसांतच गणरायाची आरती मराठीतून शिकले आणि गणेशोत्सवात त्यांनी दररोज गाऊनही दाखविली. १६ विद्यार्थ्यांनी हार्मोनियम, व्हायोलिन, सतार, बासरी व टाळाच्या गजरात ‘सकाळ’ कार्यालयातही आरती गायली.