Manoj Jarange Patil criticize Government
esakal
किरण चव्हाण, माढा
माढा, ता. : मराठयांना आरक्षण मिळवून देण्याचे मी पक्के ठरविल्याने चार प्रमाणपत्र रद्द करून मला मराठा आंदोलनापासून व मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा सरकारने पूर्वनियोजित कट रचल्याचा घणाघाती आरोप मनोज जरांगे - पाटील यांनी माढयातील सभेत केला. माढयातील मराठी शाळेत दुपारी तीन वाजता होणारी सभा प्रत्यक्ष रात्री बारा वाजता सुरू झाली. तब्बल नऊ तास मराठा बांधव वाट पाहत आहेत. यावरून समाजाचा आरक्षणाला असलेला पाठिंबा दिसून येत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी भाषणात सांगितले.