

Manoj Jarange Patil
sakal
सोलापूर : मराठा आरक्षणाला विरोध करणारा कोण? हे वेळप्रसंगी समजून घ्या. आपला माणूस कोणत्याही पक्षाचा असेना, त्याला निवडून आणले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात कुणबी समाजाला पाडले असेल तर हे तुमच्याकडेच घडले आहे. कुणबी आणि मराठा एकच आहेत. मराठवाड्यात कुणबी मोठ्या मतांनी निवडून आले आहेत. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील मराठा समाजात अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.