
पांगरी : मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रत्येक घराघरांत पोहोचविण्याचे स्वप्न उराशी बाळगून सुरू केलेला लढा यशस्वी होईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. कारी (ता. बार्शी) येथे महादेव मंदिरात आयोजित केलेल्या चावडी बैठकीत ते बोलत होते. मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.