

Mansi Godse celebrates her MPSC success, securing state rank 2 among girls; a triumph built on her parents’ hard work.
Sakal
महूद : स्वतःकडे बौद्धिक गुणवत्ता असूनही शासकीय सेवेत संधी मिळाली नाही. ही सल मनात ठेवून वडिलांनी काबाडकष्ट आणि मोलमजुरी करून मुलींना उच्च शिक्षित केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या लक्ष्मीनगर (ता. सांगोला) येथील मानसी मधुकर गोडसे हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या वनसेवा परीक्षेतून सहायक वनसंरक्षक वर्ग एक पदाला गवसणी घातली आहे.