
उ.सोलापूर : माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. त्यांच्यामुळे मराठा सेवा मंडळाची नाहक बदनामी होत असून छत्रपती शिवाजी प्रशालेतील कर्मचाऱ्यांचे चरित्रहनन होत आहे. त्यामुळे सपाटे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.