
- संतोष पाटील
टेंभुर्णी : संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला यश आल्यानंतर टेंभुर्णीतील सकल मराठा समाजाच्यावतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर व पुणे सोलापूर बायपास रस्त्यावर फटाक्याची आतिषबाजी,पेढे भरवून व लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.