Political Storm in Maharashtra as Maratha Kranti Targets NCP
Sakal
सोलापूर
...तर मराठा समाज राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करेल: राज्य समन्वयक महेश डोंगरे; धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरून ‘मराठा क्रांती’चा इशारा
Mahesh Dongare statement Maharashtra politics: धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर मराठा क्रांतीचा तीव्र विरोध; राष्ट्रवादीला इशारा
पंढरपूर : धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत मराठा समाज राष्ट्रवादी विरोधात मतदान करून, पक्षाला नेस्तनाबूत करेल, असा थेट इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व खासदार प्रफुल्ल पटेल हे दोघे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी अजित पवारांवर दबाव टाकत आहेत, असा आरोपही डोंगरे यांनी केला आहे.

