
सोलापूर: मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत आहे. मुंबईत २८ तारखेपासून होणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरासह जिल्ह्यांतून हजारो वाहनातून मराठा बांधव मुंबईला जाणार आहेत. जुळे सोलापूरमधीलही शेकडो वाहने गुरुवारी (ता.२८) सकाळी ११ वाजता गोविंदश्री मंगल कार्यालयापासून मुंबईच्या दिशेने रवाना करण्याचा निर्धार अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला. रविवारी हॉटेल मयूरवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.