
सोलापूर: मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांग पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारो बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. या बांधवांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यातून अन्नपदार्थ पाठविले जात आहेत. गावागावांमधून भाकरी, चटणी, ठेचा, पाणी आदी साहित्य घेऊन वाहने रवाना होत आहेत.