esakal | धक्‍कादायक ! 'कोरोना'मुळे मास्कची साठेबाजी 
sakal

बोलून बातमी शोधा

n 95 mask
  • वैद्यकीय व्यवसायिकांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विक्रीवर निर्बंध 
  • अन्न औषध प्रशासन आयुक्‍त अरुण उन्हाळे यांचे औषध विक्रेत्यांना आदेश 
  • मूळ किंमतीपेक्षा जादा दराने विक्री होते एन-95 मास्क अन्‌ पीपीई किट्‌स 
  • कायद्याचे उल्लंघन करुन ग्राहकांना लुबाडणाऱ्या औषध विक्रेत्यांचा परवाना होणार निलंबीत 

धक्‍कादायक ! 'कोरोना'मुळे मास्कची साठेबाजी 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्‍यक असलेले पीपीई किटस्‌ आणि एन-95 मास्कची मागणी वाढली आहे. मात्र, मागणी वाढल्याने मास्क विक्रीत साठेबाजी होऊ लागल्याच्या तक्रारी राज्य शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून आता वैद्यकीय व्यवसायिकांच्या चिठ्ठीशिवाय मास्कची विक्री करु नये, अन्यथा परवाना निलंबीत होईल, असा इशारा राज्याच्या अन्न व औषण प्रशासन विभागाचे आयुक्‍त अरुण उन्हाळे यांनी औषध विक्रेत्यांना दिला आहे. 

हेही नक्‍की वाचा : बळीराजाची कोंडी ! मध्यम, दिर्घ मुदतीची कर्जमाफी नाहीच 


चीनसह अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळत असून महाराष्ट्रात अद्याप एकही रुग्ण कोरोनाग्रस्त आढळलेला नाही. तरीही आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महापालिका व जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु केला आहे. राज्याचा आरोग्य विभाग जिल्हानिहाय नियमित आढावा घेत आहे. कोरोनोच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांमध्ये आता पीपीई किटस्‌ आणि एन-95 मास्कची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र, मागणी वाढल्याने त्याची किंमत ज्यादा आकारली जात असून मास्कचा तुटवडा असल्याचे भासवून त्यात साठेबाजी होऊ लागली आहे. या वस्तुंची विक्री करताना मूळ किंमती व्यतिरिक्‍त दुकानादारांकडून जादा दर आकरणी केली जात असून अनावश्‍यक खरेदीही करुन ठेवली जात आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी आता पीपीई किटस्‌ आणि एन-95 मास्कची विक्री वैद्यकीय व्यवसायिकांच्या चिठ्ठीशिवाय करु नये, असे निर्देश श्री. उन्हाळे यांनी दिले आहेत. 

हेही नक्‍की वाचा : सोलापुरातील वनजमिनीचे होणार निश्‍चितीकरण 


औषध व्रिकेत्यांनी अनावश्‍यक साठा करु नये 
महाराष्ट्रात अद्याप कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळला नसून तरीही नागरिक खबरदारी म्हणून पीपीई किटस्‌ आणि एन-95 मास्कचा वापर करु लागले आहेत. मात्र, पीपीई किटस्‌ आणि एन-95 मास्कची जादा दराने विक्री होत असून त्याचा अनावश्‍यक साठा केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार आता वैद्यकीय व्यवसायिकांच्या चिठ्ठीशिवाय पीपीई किटस्‌ आणि एन-95 मास्कची विक्री करु नये, असे औषध व्रिकेत्यांना कळविले आहे. 
- अरुण उन्हाळे, आयुक्‍त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई 

हेही नक्‍की वाचा : खुषखबर ! बोरामणी विमानतळासाठी 50 कोटी 


ठळक बाबी... 

  • वैद्यकीय व्यवसायिकांनी उत्पादक व पुरवठादारांकडील साठ्याची पडताळणी करावी 
  • औषध निरीक्षकांनी पीपीई किटस्‌ आणि एन-95 मास्कच्या साठेबाजीवर लक्ष ठेवावे 
  • कोरोनामुळे पीपीई किटस्‌ आणि एन-95 मास्कची जादा दराने होतेय विक्री 
  • मूळ किंमतीपेक्षा जादा दराने वस्तूंची विक्री केल्यास परवाना होणार निलंबीत
loading image