
“Karmyogi Sanstha pledges 3,000-acre, 9 lakh capacity cow shelter in Solapur during five-day festival.”
Sakal
सोलापूर : गोमाता संवर्धन व संरक्षण करण्याकरिता समर्पित असणाऱ्या सोलापुरातील कर्मयोगी संस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त जगातील सर्वात मोठी गोशाला उभारण्याचा संकल्प करण्यात आला. संस्थेतर्फे आयोजित पंचदिवसीय विशेष महोत्सवातील कोजागरी पौर्णिमेला आयोजित सुरभी याग पूर्ण करून हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.