
सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागून दुर्घटना घडलीय. यात तिघांचा मृत्यू झाला असून अद्याप काही जण आत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अडकलेल्यांमध्ये कारखान्याच्या मालकासह कुटुंबाचा समावेश आहे. रात्रभर आग धुमसत असून अग्निशमन दल आग आटोक्यात करण्याचा प्रयत्न करत आहे. सेंट्रल टेक्सटाईल मिल या टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्याला शनिवारी मध्यरात्री सुमारे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. रविवारी सकाळपर्यंत ही आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली नव्हती.