Solapur Crime : दीड लाख किमतीचा अवैध दारूसाठा जप्त
भटुंबरे शिवारातील सतीश रामा वसेकर (रा. नारायण चिंचोली, ता. पंढरपूर) याच्या वस्तीतील घरामध्ये अवैधरीत्या विक्रीसाठी देशी- विदेशी दारूचा साठा असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
Police display seized illegal liquor worth ₹1.5 lakh during a targeted anti-bootlegging raid.Sakal
पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने पोलिसांनी अवैध दारू धंद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. कारवाई दरम्यान भटुंबरे येथील एका हॉटेलमध्ये ठेवलेल्या एक लाख ५० हजार ६७२ रुपये किमतीचा ३० बॉक्स अवैध दारूसाठा जप्त केला आहे.