
सोलापूर: सातबाऱ्यावर असलेली मयताची नावे कमी करून वारसांची नोंद करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील ४ हजार २८१ सातबाऱ्यांवरील मयतांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नावे घेण्यात आली आहेत.