
Solapur’s Bidi Housing Colony submerged: 500 homes flooded, crores worth property lost.
esakal
सोलापूर : शहरात बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे जुन्या विडी घरकुल परिसरातील जवळपास ५०० घरांमध्ये पाणी शिरले आहे. अवघ्या काही तासांत येथील नागरिकांचे होत्याचे नव्हते झाले. संसार, व्यवसाय मोडून पडल्याने हतबल झालेल्या या नागरिकांच्या डोळ्यात आज दिवसभर केवळ अश्रू दिसत होते. विडी घरकुल ई, एच, जी ग्रुप, तुळशांती नगर, प्रियदर्शनी नगर, तुळजाई भोसले नगर, भारत नगर, ब्रम्हानंद नगर, चाकोते नगर भागातील जवळपास सर्वच घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांनी रात्र जागून काढावी लागली.