
सोलापूर : जीवनात सर्वार्थाने यशस्वी होण्यासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर आपला वेळ केंद्रित करावा. डॉल्बीसमोर नाचून शक्ती दाखवण्यापेक्षा समाजात जास्तीत जास्त डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक तयार करून शक्ती प्रदर्शन करणे हेच खरे शक्ती प्रदर्शन आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले.