Solapur News: दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला!; सोलापुरात भर पावसात निघाला संत नामदेव महाराज दिंडी सोहळा
''ज्ञानोबा तुकाराम''चा गजर करत सुरुवात झाली. अग्रभागी बाल वारकऱ्यांचे पथक त्यामागे भगवी पताका फडकवणाऱ्या मुली व महिला भक्त भर पावसात या दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. त्यांना संत नामदेव यूथ महिला भजनी मंडळाच्या पारंपारिक वेशभूषेतील महिला टाळाचा गजर करत साथ संगत करत होत्या.
Devotees drenched in rain yet filled with devotion during Sant Namdev Maharaj’s Dindi procession in Solapur.Sakal
सोलापूर : संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बुधवारी सायंकाळी सहा वाजता भर पावसात संत नामदेव महाराज दिंडी सोहळा भक्तिभावात पार पडला. या दिंडीसोहळ्या भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.