सोलापूर : पार्क स्टेडियमवर रंगणार महापौर चषक क्रिकेट लीग

मैदानावर सार्वजनिक कार्यक्रमांवर कायमची बंदी
park stadium
park stadiumsakal

सोलापूर : अनेक वर्षांपासून बंद असलेली महापौर चषक स्पर्धा ही क्रिकेट लिगच्या माध्यमातून सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात गुरुवारी महापौर श्रीकांचना यन्नम(mayor shrikanchna yannam) यांच्या अध्यक्षतेखाली स्टेडियम कमिटीची सभा घेण्यात आली. यावेळी महापौरांनी याची घोषणा केली. आयुक्त पी. शिवशंकर(comissinor p. shivshankar), जिल्हा परिषदेचे एसडीओ हेमंत निकम, सहायक पोलिस आयुक्त दीपक आर्वे, सहायक आयुक्त नानासाहेब माहनवार, क्रीडाधिकारी नजीर शेख, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे(solapur district cricket association) सचिव चंद्रकांत रेम्बर्सू, सदस्य हाजीमलंग नदाफ उपस्थित होते. (mayor cup cricket competition at park stadium in solapur)

park stadium
सोलापूरमध्ये सोमवारपासून ‘१५ ते १८’चे लसीकरण; जिल्हाधिकारी शंभरकर

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पार्क स्टेडियम या मैदानाचे काम पूर्ण झाले असून, हे मैदान महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने लवकरात लवकर मैदान खुले करावे, अशी मागणी यापूर्वी केली होती. क्रिकेट खेळाडूंसाठी मैदान खुले करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. पार्क स्टेडियम येथे मुख्य पीच आणि सरावासाठी आठ पीच साकारण्यात आले आहेत. येथे क्रिकेटचे सराव सामने होण्यासंदर्भात चर्चा यावेळी झाली. प्रारंभी प्रिमियर लिगला महापौर चषक नाव देण्याचे सर्वानुमते ठरले. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूंना आयकार्ड देण्यात येणार असून त्यासाठी 25 रुपये वेगळे आकारण्यात येणार आहेत. महापौर चषक क्रिकेट लिग या संदर्भात एक समिती गठित करून पुढचे निर्णय लवकरच घेण्यात येतील, अशी माहिती महापौर यन्नम यांनी यावेळी दिली.

park stadium
बार्शी नगरपरिषदेच्या प्रशासकपदी अमिता दगडे-पाटील यांची निवड

मैदान फक्त खेळासाठीच

पार्क स्टेडियम यापुढे फक्‍त खेळासाठीच उपलब्ध करून देण्यात येईल. याठिकाणी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत. पार्क मैदानावर घेण्यात येणाऱ्या महापौर चषक क्रिकेट लिगचे नियोजन स्टेडियम कमिटीमध्ये करण्यात आले. त्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी यावेळी दिली.

park stadium
थर्टी फर्स्टला ज्येष्ठांनी व मुलांनी बाहेर जाणे टाळावे : जिल्हाधिकारी

सभेत निश्‍चित केलेले भाडेदर

पार्क स्टेडियम येथे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी एका दिवसासाठी भाडे 12 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तर शनिवारी व रविवारी 15 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. सोलापूर शहरातील क्रिकेट क्‍लब सरावासाठी मासिक भाडे 15 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये रोज दोन तास सकाळ किंवा सायंकाळी सराव करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्‍लबच्या क्रिकेट सरावासाठी खेळाडूंची संख्याही 30 ठेवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com