
“₹65 lakh extortion racket exposed; WhatsApp records reveal officials’ involvement to evade MCOCA.”
Sakal
सोलापूर: ‘मकोका’अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली कारवाई टाळण्यासाठी सहायक फौजदाराच्या माध्यमातून संशयितांकडे ६५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांविरुद्ध अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे हा कोल्हापूर पोलिस मुख्यालयात कार्यरत असून त्याच्यासोबत माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूकजवळील वडाचीवाडी येथील सतीश रामदास सावंत, समीर अब्बास पानारी (वय ३५, रा. महावीर नगर, हुपरी, ता. हातकणंगले), मुंबईतील कमलेश रमेश कानडे (रा. लालबाग, मुंबई) आणि लाला ऊर्फ लालासाहेब ज्ञानेश अडगळे (रा. अकलूज, ता. माळशिरस) यांचाही त्यात समावेश आहे. पोलिसांनी समीर पानारी व लाला अडगळे यांना अटक केली आहे.