esakal | वाहनचालकांनो, वाहतूक कोंडीवर निघाला तोडगा ! पोलिस उपायुक्‍त डॉ. धाटे यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Traffic

वाहनचालकांनो, वाहतूक कोंडीवर निघाला तोडगा!

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

शहरात प्रवेश केल्यापासून शहराबाहेर पडेपर्यंत वाहनचालकांसह पादचाऱ्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते, हा नेहमीचाच अनुभव.

सोलापूर : शहरात प्रवेश केल्यापासून शहराबाहेर पडेपर्यंत वाहनचालकांसह पादचाऱ्यांना वाहतूक कोंडीला (Traffic jam) सामोरे जावे लागते, हा नेहमीचाच अनुभव. बेशिस्त वाहतूक, रस्त्यालगतची पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी होते. बेशिस्त वाहतुकीने अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. त्यावर आता वाहतूक पोलिसांनी उपाय शोधला असून, वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोलिस अंमलदार नियुक्‍त करणे, एकेरी वाहतूक, नवीन सिग्नल उभारणीचाही समावेश आहे. (Measures have been initiated by the traffic police branch on traffic jams-ssd73)

हेही वाचा: दुसऱ्या डोससाठीही मिळेना लस ! 29 लाख व्यक्‍तींना लस नाहीच

शहरातील कोंतम चौक, कन्ना चौक, मधला मारुती, समाचार चौक, कुंभार वेस, बाराइमाम चौक या ठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून त्या ठिकाणी बॅरिकेड्‌स लावण्यात आले आहेत. तसेच पर्यायी रस्ता दर्शवणारा दिशादर्शक फलक व पोलिस अंमलदाराची नियुक्‍ती करण्यात आली आहे. काही ठिकाणी दुचाकींसाठी तर काही ठिकाणी तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी पर्यायी रस्ता दिला आहे. मंगळवार पेठ चौकी, मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, बेगमपेठ चौकी या परिसरातील बाजारपेठांमुळे मोठी गर्दी होते. त्यामुळे त्या ठिकाणी आता प्रत्येक चौकात पोलिस अंमलदार असणार आहेत. अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्यांवर क्रेनद्वारे कारवाई केली जाणार आहे. अवजड वाहने निर्धारित वेळेशिवाय शहरात येणार नाहीत, याची काटेकोरपणे दक्षता घेतली जाणार आहे. जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही. तसेच अपघातही टाळता येतील, असा विश्‍वास पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे (Deputy Commissioner of Police Dr. Deepali Dhate) यांनी व्यक्‍त केला आहे.

हेही वाचा: कॉलेज सकाळी तर शाळा दुपारी! जिल्ह्यात उद्यापासून 345 शाळा उघडणार

असे आहे नियोजन

  • छत्रपती शिवाजी चौक ते मेकॅनिक चौकापर्यंत लावले बॅरिकेड्‌स; त्या ठिकाणी चार पोलिस अंमलदारांची नियुक्‍ती

  • निराळे वस्तीकडून येणाऱ्यांना नवी वेसकडे जाण्यासाठी भागवत थिएटर समोरून नव्हे तर छत्रपती शिवाजी चौकातून जावे लागणार

  • नवीवेस पोलिस चौकीसमोर आता वाहतूक पोलिस अंमलदार; त्या परिसरात नवीन सिग्नल उभारला जाणार

  • नवीवेस पोलिस चौकी परिसरात दररोज सकाळी आठ ते दुपारी दोन आणि त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत असणार वाहतूक पोलिस

  • छत्रपती शिवाजी चौक परिसर व अन्य ठिकाणच्या बेशिस्त वाहनांवर विशेषत: रिक्षांवर ई-चलनाद्वारे कारवाई

  • सिग्नल दुरुस्ती, रस्त्यांवरील मोकाट जनावरे व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात वाहतूक पोलिस शाखेचे महापालिकेला पत्र

नव्याने प्रस्तावित

  • एकेरी वाहतूक : आपटे ज्वेलर्स ते पारस इस्टेट

  • नवीन सिग्नल : नवी वेस पोलिस चौकीसमोर

  • सम-विषम पार्किंग : विजापूर वेस- माणिक चौक

व्यापारी संघटना, ट्रान्सपोर्ट चालकांसोबत समन्वय साधून वाहतूक व्यवस्थापन केले जात आहे. रस्त्याला अडथळा करणारे फेरीवाले, रिक्षांसह अन्य वाहनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

- डॉ. दीपाली धाटे, पोलिस उपायुक्‍त, सोलापूर शहर

loading image