Pandharpur News : मुस्लिम तरुणाकडून वैद्यकीय साहित्य; आगळ्या वेगळ्या विठ्ठलभक्तीचे सर्वत्र कौतुक

मुज्जमिल कमलीवाले असे या मुस्लिम तरुणाचे नाव आहे. मुज्जमिल याच्या आगळ्या वेगळ्या विठ्ठलभक्तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
medical equipment from Muslim youth to pandharpur Vitthal rukmini temple solapur
medical equipment from Muslim youth to pandharpur Vitthal rukmini temple solapurSakal

पंढरपूर (जि. सोलापूर) : पंढरपूर येथील एका मुस्लिम तरुणाने विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी वैद्यकीय उपकरणे आणि प्रथमोपचारासाठी लागणारे वैद्यकीय साहित्य मंदिर समितीला भेट दिले आहे. मुज्जमिल कमलीवाले असे या मुस्लिम तरुणाचे नाव आहे. मुज्जमिल याच्या आगळ्या वेगळ्या विठ्ठलभक्तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना आपणही मदत करावी, या भावनेतून कमलीवाले याने आपला वाढदिवस साजरा न करता, बचत वाचलेल्या पैशांतून भाविकांसाठी ऑक्सिपल्स मीटर, शुगर तपासणी मशिन यासह वैद्यकीय उपकरणे व औषधे मंदिर समितीला भेट दिली आहेत. दरवर्षी तो गोरगरीब नागरिकांना मदत करून वाढदिवस साजरा करतो.

यापूर्वीही त्याने गरीब मुलांना कपडे, दिवाळीचा फराळ भेट देऊन त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी केली होती. तर कोरोनाकाळात अनेक रुग्णांना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून मदत केली होती. त्याच्या या मदतीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन तर घडलेच शिवाय सामाजिक बांधिलकी जपण्याच्या जबाबदारीचा संदेशही या माध्यमातून त्याने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com