सोलापूर : ‘काढा’ सोडा, ‘एसएमएस’च पाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona sanitizer

सोलापूर : ‘काढा’ सोडा, ‘एसएमएस’च पाळा

सोलापूर : कोरोना महामारीनंतर (corona virus solapur)पूर्वपदावर आलेले जनजीवन व अर्थव्यवस्था(economy) पुन्हा एकदा तिसरी लाट/ओमिक्रॉनच्या(omicron third wave) सावटाखाली येऊ लागली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरलेला मालेगाव काढा असो की त्या-त्या भागात तयार केलेले काढा मधल्या काळात बंद झाला होता. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी तुमच्या डोक्‍यात काढ्याचा विचार असेल तर तो आत्ताच सोडा. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायरझ (SMS) हाच जुना फॉर्म्युला प्रभावी ठरेल असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: महाविकास आघाडीचे 'असे' असेल जागावाटप! भाजपला रोखण्यासाठी तयारी

आद्रक, लवंग, गुळवेल, हळद, मुसळी, तुळशीची पाने, दालचिनी, काळी मिरी, मध, ईलायची, काळे मीठ, ज्येष्ठ मध यासह अनेक माहिती नसलेली नावे कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत सर्वसामान्यांना समजली. कोरोना रोखण्यासाठी रोज दोन ते तीन टाईम काढा पिण्याची जणू काहीजणांना सवयच जडली होती. काढ्यामुळे नंतरच्या काळात उष्णता वाढणे, घशाचा त्रास, मुळव्याध यासह इतर व्याधी काहीजणांना उद्‌भवल्या असल्याचेही समोर आले होते. दिवसभरात काढा आणि मटण, चिकन, अंड्यावर अनेकांनी ताव मारला होता. ओमिक्रॉनचा वेग भयंकर असल्याने बाधा झाल्यानंतर हे सर्व करण्यास कमी कालावधी मिळण्याची शक्‍यता आहे.

महत्वाच्या टिप्स्‌

  1. तातडीने कोरोना लसीकरण करुन घ्या

  2. मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर आजाराच्या रुग्णांनी त्यांचे आजार नियंत्राणात ठेवावेत

  3. आहार, व्यायाम या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती बळकट होण्यासाठी विशेष लक्ष द्या

  4. सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास असल्यास तातडीने निदान करा, उपचार घ्या

  5. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्‍यतो टाळा, सोशल डिस्टन्स प्रकर्षाने पाळा

हेही वाचा: सोलापूर : पतीला सोडा म्हणत महिलेने अंगावर ओतून घेतले पेट्रोल

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातही कमी प्रमाणात वाढ दिसू लागली आहे. उपचारासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरु आहे. पहिल्या दोन लाटांपेक्षा या लाटेचा वेग अधिक आहे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि कोरोना लसीकरण याशिवाय सध्या तरी ठोस पर्याय दिसत नाही.

- डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top