सोलापूर : पतीला सोडा म्हणत महिलेने अंगावर ओतून घेतले पेट्रोल

प्लास्टिकच्या बाटलीत आणलेले पेट्रोल गुन्हे शाखेच्या कार्यालयातच अंगावर ओतून घेतले.
Crime
CrimeSakal
Updated on

सोलापूर : घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी शिवलाल उर्फ शिवाजी सरदार काळे याची पत्नी महादेवी शिवलाल उर्फ शिवाजी काळे (रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) हिने "माझ्या पतीला सोडा' म्हणत प्लास्टिकच्या बाटलीत आणलेले पेट्रोल गुन्हे शाखेच्या कार्यालयातच अंगावर ओतून घेतले. याप्रकरणी आठजणांविरुध्द सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (Solapur Crime News)

पोलिस उपनिरीक्षक अमित सिदपाटील यांनी सदर बझार पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, बार्शी शहरातील घरफोडीतील संशयित आरोपी शिवलाल याच्याकडे चोरीचा मोबाइल असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर चोरीला गेलेला मोबाइल त्याच्याकडे आढळला. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अधिक चौकशीसाठी सोलापूर तालुका पोलिस ठाण्याजवळील गुन्हे अन्वेषणच्या कार्यालयात आणले. त्यावेळी त्याची पत्नी महादेवी काळे व तिच्यासोबत काही अनोळखी पुरुष व पाच महिलांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात आले.

Crime
निष्पाप मराठी युवकांवरील गुन्हे मागे घ्या; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

त्यांनी तेथील पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तर पोलिस हवालदार प्रकाश काटकर यांना धक्‍काबुक्‍की केली. तसेच कार्यालयातील टेबलवरील कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून दिले. त्यांच्याविरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तत्पूर्वी, महादेवी हिने सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले आणि "माझ्या पतीला सोडा नाहीतर, पेटवून घेते', अशी धमकी दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

आता सदर बझार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर हे पुढील तपास करीत आहेत. शिवलाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द बार्शी व सोलापुरातील जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात यापूर्वीचे गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्याला बार्शी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com