
सोलापूर: दोन वर्षीय बाळ सकाळी झोपेतून रडतच उठले. घाम आलेला. डोळे पांढरे केलेले. उपचारासाठी भागवत टॉकीजजवळील चिरायू हॉस्पिटलमध्ये दाखल केले. श्वास घेण्यास त्रास अन् तोंडाला फेसही आलेला. रात्री ८ वाजता नातेवाइकांनी बालकाला मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये हलवले. पण, उपयोग झाला नाही. उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू झाला. चिरायू हॉस्पिटलमधील डॉ. कुंदन चोपडे यांच्या हलगर्जीपणामुळेच दोन वर्षीय बाळ दगावल्याची तक्रार नातेवाइकांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे दाखल केली आहे.