
-अरविंद मोटे
संत तुकाराम महाराज पालखीमार्ग : गेल्या ४० वर्षांपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी मोहिते- पाटील परिवाराचा मानाचा अश्व असतो. पूर्वीच्या ‘सरकार’नंतर आता ‘बलराज’ नावाचा मानाचा अश्व आहे. बलराजला गूळ- तुपातला भुसा खायला आवडतो. विजेच्या वेगाने तो रिंगण पूर्ण करतो.