

Police probe begins after threat allegations following a felicitation event in Dudhni.
sakal
सोलापूर : निवडणुकीत विरोधात काम केल्याचा ठपका ठेवून आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार केल्याच्या कारणावरून शंकर म्हेत्रे यांनी आपल्याला आणि आपल्या पतीला सर्वांसमोर शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिली, असा गंभीर आरोप दुधनी येथील मेहराज मन्सूरखान पठाण यांनी केला आहे. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा दुधनी येथील मेहराज पठाण यांनी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.