esakal | पुरुषच कोरोनाचे सर्वाधिक बळी ! आज शहरात 19 पुरुष अन्‌ 15 महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

HospiBuz_Covid-19-Breakthrough-compressor.jpg

ठळक बाबी... 

  • शहरातील 87 हजार 178 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरातील पाच हजार 413 पुरुषांना कोरोनाची बाधा 
  • शहरातील तीन हजार 787 महिलांना झाला कोरोना; 172 महिलांचा झाला मृत्यू 
  • आतापर्यंत सात हजार 960 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • आज अक्‍कलकोट रोडवरील गांधी नगरातील 55 वर्षीय महिलेचा झाला मृत्यू 

पुरुषच कोरोनाचे सर्वाधिक बळी ! आज शहरात 19 पुरुष अन्‌ 15 महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील सर्वाधिक पुरुषच कोरोनाचे बळी ठरले असून एकूण रुग्णांमध्येही पुरुषच अव्वल आहेत. आतापर्यंत शहरातील पाच हजार 413 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात 340 पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरातील तीन हजार 787 महिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 172 महिला कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत. आज शहरात 346 अहवालात 19 पुरुष आणि 15 महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सर्व नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर अशा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील 87 हजार 178 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरातील पाच हजार 413 पुरुषांना कोरोनाची बाधा 
  • शहरातील तीन हजार 787 महिलांना झाला कोरोना; 172 महिलांचा झाला मृत्यू 
  • आतापर्यंत सात हजार 960 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • आज अक्‍कलकोट रोडवरील गांधी नगरातील 55 वर्षीय महिलेचा झाला मृत्यू 

शहरात आज रेसिडेन्सी क्‍वार्टर, शाहीर वस्ती (भवानी पेठ), बाळे, नेताजी सुभाष सोसायटी (भारती विद्यापीठजवळ), जीवनज्योती नगर (रंगभवन), गांधी नगर (अक्‍कलकोट रोड), संतोष नगर (बाळे), स्वामी समर्थ नगर, न्यू पाच्छा पेठ (अशोक चौक), बिलाल नगर (जुळे सोलापूर), लष्कर (दक्षिण सदर बझार), विडी घरकूल, बाल शिवयोगी नगर, लक्ष्मी- विष्णू हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), भवानी पेठ, कर्णिक नगर, हैदराबाद रोड, सात रस्ता (रेल्वे लाईन), भवानी पेठ, अंत्रोळीकर नगर (होटगी रोड), आशा नगर (एमआयडीसी रोड) आणि विजय देशमुख नगर (विजयपूर रोड) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरात सध्या अवघे 43 संशयित होम क्‍वारंटाईन असून 87 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन आहेत.

loading image