महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक !

महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका ! राज्यातील "या' नऊ जिल्ह्यांत धोका कायम
महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका ! राज्यातील "या' नऊ जिल्ह्यांत धोका कायम
महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका ! राज्यातील "या' नऊ जिल्ह्यांत धोका कायमSakal Media
Summary

कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या पुरुषांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

सोलापूर : आतापर्यंत सोलापूर शहरातील (Solapur) 17 हजार 201 पुरुषांना तर 11 हजार 923 महिलांना कोरोनाची (Covid-19) बाधा झाली आहे. त्यात 923 पुरुषांचा तर 518 महिलांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, ग्रामीणमधील 96 हजार 314 पुरुषांना तर 64 हजार 248 महिला कोरोना पॉझिटिव्ह (Corona) आढळल्या आहेत. त्यापैकी दोन हजार 180 पुरुषांचा तर एक हजार 122 महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या पुरुषांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाचे (Department of Health) म्हणणे आहे.

महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका ! राज्यातील "या' नऊ जिल्ह्यांत धोका कायम
नातं रक्तापलीकडचं! राखीच्या प्रेमाने बहिण-भावांचे उजळले नाते

राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. त्यात मुंबई, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण त्या ठिकाणी आढळत आहेत. चिंतेची बाब म्हणजे, सोलापूर ग्रामीणमध्ये रविवारी दहा रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून त्यात 29 वर्षीय व 35 वर्षीय तरुण महिलांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये रविवारी अक्‍कलकोट तालुक्‍यात पाच, बार्शी तालुक्‍यात 44, करमाळा तालुक्‍यात 57, माढा तालुक्‍यात 79, माळशिरस तालुक्‍यात 69, मंगळवेढ्यात चार, मोहोळ तालुक्‍यात चार, उत्तर सोलापूर तालुक्‍यात आठ, पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक 131, सांगोल्यात 43 तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात तीन रुग्ण वाढले आहेत. ग्रामीणमधील दहा मृत्यूपैकी नेवरे (ता. सांगोला) येथील 29 वर्षीय तरुणीचा तर हंगीरगे (ता. माळशिरस) येथील 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे. ग्रामीणमधील रुग्णसंख्या आतापर्यंत एक लाख 60 हजार 562 झाली असून त्यातील तीन हजार 302 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, एक लाख 53 हजार 128 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले असून सध्या चार हजार 132 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील 29 हजार 124 रुग्णांपैकी 27 हजार 635 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले असून सध्या 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी शहरात नऊ तर ग्रामीणमध्ये 457 रुग्णांची वाढ झाली आहे. आजार अंगावर काढणे, नियमांचे काटेकोर पालन न केल्याने रुग्ण अन्‌ मृत्यू वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका ! राज्यातील "या' नऊ जिल्ह्यांत धोका कायम
ऐन सणासुदीत महागाईमुळे साखरही होऊ लागली कडू

महिलांच्या तुलनेत पुरुष सर्वाधिक बाधित

आतापर्यंत शहरातील 17 हजार 201 पुरुषांना तर 11 हजार 923 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात 923 पुरुषांचा तर 518 महिलांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, ग्रामीणमधील 96 हजार 314 पुरुषांना तर 64 हजार 248 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यापैकी दोन हजार 180 पुरुषांचा तर एक हजार 122 महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या पुरुषांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com