
Solapur: राज्य सरकारने शालेय पोषण आहार योजनेत प्रतिदिन, प्रतिविद्यार्थी लाभार्थी खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एक मे २०२५ पासून सुधारित दर लागू केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील चार हजार ७६ शाळांमधील चार लाख ७८ हजार १३४ हून अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना धान्यासाठी पूर्वी ५.४५ रुपये प्रतिविद्यार्थी मिळायचे. आता ६.७८ रुपये मिळणार आहेत.