
Customers queue up to buy buffalo milk at ₹120 per litre during Kojagiri night; 8,000 litres sold in local markets.
Sakal
उ. सोलापूर : कोजागरी पौर्णिमेनिमित्त सोलापूरच्या सुट्या दूध बाजारात ग्राहकांनी गर्दी केली. ग्राहकांचा कल म्हैस दूध खरेदीकडे होता. सोमवारी दूध बाजारात म्हशीच्या दुधाला साठ रुपयेपासून ते १२० रुपये प्रतिलिटरपर्यंत दर मिळाला. जवळपास आठ हजार लिटरची दूध विक्री बाजारात झाली.