Milk Rate
sakal
सोलापूर, : पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळी स्थिती आणि सणासुदीमुळे शहरासह जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. त्यातच चाऱ्याच्या टंचाईमुळे दूध उत्पादनात घट झाल्याने दूध संस्थांमध्ये खरेदीसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. गायीच्या दुधाचा जाहीर खरेदी दर प्रतिलिटर ४१ रुपये असताना काही संस्था ४३ रुपयांपर्यंत दर देत असल्याने दुधाची पळवापळवी सुरू झाली आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास आगामी काळात दूध दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.