

Relief for Dairy Farmers as Cow Milk Procurement Rate Reaches ₹41 per Litre
sakal
-संदीप गायकवाड
उ. सोलापूर : गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ झाली असून ते प्रतिलिटर ४० रुपयांपुढे गेले आहेत. राज्यात दूध संकलन करणाऱ्या गुजरातमधील अमूलच्या संलग्न जिल्हा दूध संघांनी हे दर जाहीर केले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील दूध संकलनात घट झाली आहे. यामागे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा दूध उत्पादकांकडून केला जात आहे.