
Minister Bharat Gogawale inaugurating development works and addressing citizens through a rally ahead of municipal elections.
esakal
सोलापूर: प्रभाग क्र. १६ मधील ३ कोटी २० लाख रुपयांच्या विकासकामांचे रविवारी राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यानिमित्ताने त्यांनी युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, राज्य प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्या माध्यमातून रॅलीद्वारे लोकांशी संवाद साधला. शिवसेनेने आगामी महापालिका निवडणुकीचे बिगुल या रॅलीच्या निमित्ताने वाजवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.