
Minister Bharat Gogawale addressing a gathering in Mohol, urging victory in ZP and Panchayat Samiti elections.
Sakal
-राजकुमार शहा
मोहोळ: मोहोळकडे राजू खरे यांच्या माध्यमातून आमदारकीचा नवीन चेहरा आहे. भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये विजय मिळवून सत्ता स्थापन करा आणि त्या माध्यमातून मिळवा निधी उपलब्ध होईल. त्यामुळे कोणाकडेही निधी मागण्याची वेळ येणार नाही. सर्वांना ताकद देण्याचे काम आम्ही करू, मोहोळच्या विकासासाठी जास्तीत जास्त मदत करू जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केले.